पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

आर्यांची राज्यव्यवस्था.

कारण, एकंदर सृष्टिक्रम पाहून तत्संबंधी लक्षपूर्वक कता. विचार केला तर, असें खचित् दिसून शास्त्याची अवश्य- येईल कीं, हा जगड्वाळ कारखाना, वही प्रचंड आणि अद्भुत घडामोड, अगदी नियमित रीतीनें चालली आहे. इतकेंच नाहीं तर, त्यांत पूर्ण व सर्व प्रकारची व्यवस्थाही अगदी अबाधित आहे. आणि ह्यावरूनत्र असेंही अनुमान होतें कीं, सामाजिक व्यवस्था सुरळीत चालून ती सर्वत्र सारखी राहण्यासाठीं, कोणी तरी नियंता अथवा शास्ता असणें अवश्य आहे. आणि तो असेल तरच, जीव संरक्षण होऊन शांतता वाढेल; धनसंगोपनाची बिलकुल काळजी राहणार नाहीं; नीतीचा प्रसार चोहोंकडे होईल; दुराचरण लयास जाईल; व धर्मसंस्थांचे बीजारोपण होऊन, विद्याविलास ठायीं ठायीं दृष्टीस पडेल. नाहींपेक्षां जिकडे तिकडे एकच गोंधळ होऊन भ्रष्टाकार माजेल. बेबंदनगरी आणि झोटिंग पाद- शाही सुरू होईल. जो तो दुसऱ्यास लुटण्याची इच्छा धरून, आपण आळशी व कफल्लक राहील. मनुष्यास आपापल्या श्रमाचें आणि उद्योगाचें फळ कधींही भोगा- वयास सांपडणार नाहीं. आणि असें झाले म्हणजे सहजींच सर्वत्र हाहाःकार होऊन, सुधारणेचे पाऊल मार्गे पडेल. ह्या सर्व गोष्टींचा विचार आमच्या आर्यानीं प्रथम- पासूनच केला होता. इतकेंच नाहीं तर, राजा आणि