पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

१५

आर्यांची राज्यव्यवस्था.

आणि पिढीजाद असावेत. कारण, ते तसे वंशपरंपरेने चालत आलेले असले, तरच त्यांच्या मनांत स्वप्रभूविषयीं दिवसानूदिवस जास्त प्रेम वाढत जाऊन, ते निमकहरामपणा करण्यास सहसा प्रवृत्त होत नाहीत. तसेच हे मंत्री शूर व शास्त्रज्ञ असून, मोठ्या कुलांतले व समरांगणांत तरवार गाजविलेले असावेत, म्हणजे त्यांस दुर्धर प्रसंगाचा यत्किंचितही बाऊ न वाटतां, सोंपविलेले कार्य ते मोठ्या हिमतीनें, उत्साहाने, व अलौकिक साहसाने तडीस नेतात. अशा प्रकारचे मंत्री पसंत केल्यावर महत्वाच्या हरएक बाबतींत राजानें त्यांची सल्लामसलत घ्यावी. आणि संधिविग्रहादि विचार, साम दाम दंड भेदादि प्रकार, प्रजाशासनपद्धति, प्रजेचे शिक्षण व पोषण, सेनारक्षग, आणि कोश व स्त्री- वर्गादिकरून एकंदर राष्ट्राचे संगोपन, ह्याविषयीं डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस राजानें मनन करावें.
 सचिवमंडलानंतर विशेष महत्वाचा सेवक वर्ग म्हटला राजदूत. म्हणजे राजदूत होय. हा आपल्या कामांत अगदी निष्णात असला पाहिजे. व हा जितका चतुर आणि मुत्सद्दी असेल, तितकें ह्याचें श्रेष्ठत्व साहजीकच जास्त असतें. कारण,


१ तैः सार्धं चिन्तयेोनित्यं सामान्यं संधिविग्रहम् ।
स्थानं समुदयं गुप्तिं लब्धप्रशमनानि च ॥ ५६ ।।

( मनुस्मृति. भ. ७.)