पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८

[ भाग

भारतीय साम्राज्य.

 अशा प्रकारें सर्व तऱ्हेची कडेकोट तयारी असली म्हणजे, बाह्योपप्लवाची भीति सहसा अतः संक्षोभ न होण्या- विषयी तजवीज. राहत नाहीं. आणि अर्थातच, ही भीति कमी झाली म्हणजे प्रजेच्या सुखभोगाकडे चांगले लक्ष पोहोचविण्यास साहजीकच पुष्कळ अवधि राहते. अशा शांततेच्या वेळीं राजानें फारच झटून खुनी, दरोडेखोर, व चोर लोकांचा बंदोबस्त करून, दुराचारी आणि विषयी, धर्मभ्रष्ट व कुमार्गी, तसेंच व्यसनीं आणि मदांध, इत्यादि सर्व लोकांचा खरपूस समाचार घेतला पाहिजे. नाहीं तर, षड्भाग करभार देणाऱ्या प्रजेचे मन क्षुब्ध होऊन, राज्यांत बंडावा माजेल. सबब, त्याचा बंदोबस्त होण्याकरितां, आपल्या प्रजेचें मन हरएक प्रकारें राजी राखून, राज्यांत चिरकाल शांति राहील असा प्रयत्न राजाने सतत केला पाहिजे.
देशांत खरोखर चांगली स्वस्थता व शांतता रहावी एतदर्थ अपराधी, पातकी, आणि दुराचारी, यांचें उत्तम प्रकारें निर्मू- शांततेचे उपाय.


१ रक्षणादार्यवृत्तानां कंटकानां च शोधनात् ।

नरेंद्रास्त्रिदिवं यान्ति प्रजापालनतत्पराः ॥ २५३ ।।
भशासंस्तस्करान्यस्तु बलिं गृह्णति पार्थिवः ।

तस्य प्रक्षुभ्यते राष्ट्रं स्वर्गाच्च परिहीयते ।। १५४ ।।

(मनुस्मृति. अ. ९ )