पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा]

१९

आर्यांची राज्यव्यवस्थाः

लन होऊन, जेणेकरून स्वराज्य चिरकाल निष्कंटक राही ल अशी तजवीज विचारी भूपतीनें जरूर ठेविली पाहिजे. एतत्संबंधीं नानाविध उपाय, व चोर तस्कर निवारणार्थं पटुतर कल्पनाचातुर्य, मनुस्मृतीत चांगल्या प्रकारें दि- सून येतें. त्यावरून तत्कालीन आर्याच्या दूरदर्शित्वाचें उत्तम प्रकाशन होऊन, आज सुमारें तीन हजार वर्षांमागे देखील, सुधारणा व राज्यधुरीणत्व, धनसंरक्षण व जी- वितसंरक्षण, प्रजासंगोपन व प्रजापालन, इत्यादि संबं- धानें आमचें पाऊल इतर सर्व राष्ट्रांपेक्षा किती पुढे होर्ते, याचें चांगलें दिग्दर्शन झाल्यावांचून खचित राहत नाहीं. असो. स्वकीय राज्यांत हरएक प्रकारें शांतता राखण्या- साम, दाम, दंड, व भेद. साठी राजानें साम, दाम, दंड, आणि भेद, ह्या चारही उपायांची प्रसंगानु- सार योजना केली पाहिजे. तथापि होता होई तोंपर्यंत संग्रामाची वेळ न येई, असें धोरण राखिलें पाहिजे. परंतु शत्रु फारच उन्मत्त झाल्यामुळे शिरजोर


१ मनुस्मृति अ. ७८९.
२ साम्ना दानेन भेदेन समस्तैरथवा पृथक् ।
विजेतुं प्रयतेतारीन युद्धे न कदाचन ॥ १९८ ॥
भनित्यो विजयो यस्मादृश्यते युद्धमानयोः ।
पराजयश्च संप्रामे तस्माद् युद्धं विवर्जयेत् ॥ १९९ ॥

(मनुस्मृति भ. ७)