पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

[ भाग

भारतीय साम्राज्य.

झाला असल्यास, किंवा, त्याचें वेळींच शासन झालें नाहीं तर तो डोईजड होईल असें वाटत असल्यास,त्याचें पारिपत्य अवश्य करावें. मात्र, आपलें व शत्रूचें बलावल जाणून, व अमात्य, सैन्य, आणि धनादि सामग्री, यांचे चांगले पाठबळ असल्या कारणानें आपली खचित सरशी उचितकाली शत्रु- वर चाल. होईल, असें वाटत असल्यास लढा- ईच्या भरीस पडावें; आणि उचित- काल पाहून शत्रूवर हल्ला करावा. तदनंतर सपाट जागी अश्वरथादि साधनांनी युद्ध क- रावें. अथवा, उदकावृतस्थानांत गजनौकादिक साधनांनी, किंवा, वृक्षादि लतांची गर्दी असल्यास चापेकरून, आणि उघड्या ठिकाणी, ढाल तलवारीने लढण्याची सर्व तयारी असावी.
सैन्यांत लढण्यासाठी जे लोक ठेवावयाचे ते धिप्पाड, व


१ मार्गशीर्ष शुभे मासि यायाद्यात्रां महीपतिः ।
फाल्गुनं वाथ चैत्रं वा मासौ प्रतियथाबलम् ॥ १८२ ॥
अन्येष्वपि तु कालेषु यदा पश्येद्भुवं जयम् ।
तदा यायाद्विगृह्यैव व्यसने चोत्थिते रिपोः ॥ १८३॥
५ स्यन्दनाश्चैः समे युद्धेदनूपे नौद्विपैस्तथा ।
वृक्षगुल्मावृते चापैरसिचर्मायुधैः स्थळे || १९२ ॥

(मनुस्मृति. अ. ७ ).