पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

२१

आर्यांची राज्यव्यवस्था.

बुद्धासाठीं, लढवय्ये मजबूत असावेत. आणि असे लोक लोकांची सैन्यांत भरती. बहुतकरून भरतखंडाच्या उत्तरेक- डील भागांत उपलब्ध होत असल्या- मुळे तिकडूनच त्यांची होता होई तों भरती करावी. त- थापि, इतर ठिकाणचे लोक देशाभिमानी, शूर, व पाणी- दार असल्यास, त्यांस देखील लढवय्ये बनवावे. उतर- हिंदुस्थानांतील शिपाई लढवय्ये असल्याविषयीं ज्याप्र माणें हल्ली प्रसिद्धि आहे, त्याप्रमाणेंच फार प्राचीनकाळी देखील मोठी आख्या होती. कारण, कुरुक्षेत्र, मत्स्य- देश, पांचालदेश, व शूरसेन, इत्यादि देशांतून मोठ्या आणि पृथुवक्षस्थळाचे योध्ये शोधून काढण्याविषयीं, मनु- स्मृतीत उल्लेख आहे.

कुरुक्षेत्रांश्च मत्स्यांच पंचालाञ्शूरसेनजान् । दीर्घांचैव नरानग्रानीकेषु योजयेत् ॥ १९३ ॥

( अध्याय ७ )

 अशा योद्ध्यांची व पराक्रमी पुरुषांची चमू सिद्ध झा सैन्याचे विभाग व त्यांचे अधिपत्य. ल्यानंतर, एकंदर सेनासमूहावर चांगली देखरेख रहावी एतदर्थ, त्याचे नियमित विभाग करून, त्या प्रत्ये- कावर योग्यतेनुरूप अधिपति नेमावे ह्मणून स्मृतिवचन आहे. एक रथ, एक गज, तीन घोडेस्वार, आणि पांच पायदळ, यांचें आधिपत्य ज्याच्याकडे असतें त्याला