पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

२५

आर्यांची राज्यव्यवस्था.

पिटवावी, जाहिरनामे लावावे, आणि चांगली प्रसिद्धि करावी, अशी स्पष्ट मन्वाज्ञो आहे. तदनंतर, पराजित प्रजेच्या धर्माचें संरक्षण होण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष ठेवून, नवीन काबीज केलेल्या प्रांतांतील नागरिक हे आज्ञाधारक आणि वश झाले असल्यास, सर्व मंत्रिवर्गा- च्या सल्ल्याने त्यांजवर अम्मल चालविण्याकरितां, आपला मांडलिक ह्मणून एक तद्वंशज राजपुत्र गादीवर बसवावा. आणि तत्संबंधी राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातीं ठेवून, त्याचें सर्व प्रकारें कल्याण होईल अशी दक्षता बाळगावी. आमच्या आर्यांची ही प्राचीन काळची राज- नीति, आणि सांप्रतची आंग्ल प्रभूंची राजनीति, यांची सूक्ष्म दृष्टीनें तुलना केली तर, अर्से खचित दिसून येईल कीं, पौरस्त्य देशांतील राजकीय व्यवस्थेचें अनुकरण


1 “The settlement of & conquered country is conducted on equally liberal principles. Immediate security is to be assured to all by proclamation. The religion and laws of the country are to be_main- tained and respected; and as soon as time has been allowed for ascertaining that the conquered people are to be trusted, a prince of the old royal family is to be placed on the throne, and to hold his kingdom as a depedence on the conqueror."

( Elphinstone's H, of India ).
P. P. 47--48.