पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२वा ]

२९

आर्याची राज्यव्यवस्था.

तर त्यांबद्दल एक पर्ण, ह्मणजे ऐंशी कवड्या, किंवा सव्वा पैसा, अथवा सव्वा शिवराई, दिला पाहिजे; एका डोई ओझ्याला अर्धा पण; गाय, बैल, घोडा, इत्यादि जना - वरें दस्तुरीवरून गेल्यास पणाचा चतुर्थीश, आणि भार- रहित मनुष्यापासून पणाचा (१/८) एक अष्टमांश; याप्रमाणें करभार घेण्याविषयीं मन्वाज्ञा आहे.
 याप्रमाणे आपल्या राज्याची एकंदर जमाबंदी व तिची वसूल बांकी, याविषयीं यथा- लष्करी व मुलकी न्यायं भाणि काळजीपूर्वक नियमन बंदोबस्त. केल्यावर, स्वराष्ट्राचें योग्य व सुलभ रीतीने संरक्षण होण्यासाठी, राजानें अगदी तयार, व उत्तम प्रकारें शिकलेली, अशी फौज राखावी. आणि ठिक- ठिकाणच्या जरूरीप्रमाणे, ह्मणजे दोन, तीन, किंवा पांच, अथवा शंभर गांवामिळून एक पलटण ठेवून, तिजवर एक गुल्माधिपति नेमावा; आणि त्या सर्वांवर योग्यतेनुरूप एका सेनाधिपतीची नेमणूक करावी. अशा प्रकारें लष्करी बंदोबस्त झाल्यावर, ठिकठिकाणचा मुलकी *


१ " अशीतिभिर्वराटकैः ' पण ' इत्यभिधीयते । " ( म. स्मृ.)

२ द्वयोप्रयाणां पंचानां मध्ये गुरुममधिष्ठितम् ।
तथा प्रामशतानां च कुर्याद्राष्ट्रस्य संग्रहम् ।। ११४ ॥
३ ग्रामस्याधिपतिं कुर्याद्दशग्रामपतिं तथा ।

विंशतीशं शतेशं च सहस्रपतिमेव च ।। ११५ ।।

( म. स्म. भ. ७.)