पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३वा ]

३५

आर्यांची शासनपद्धति.

ब्राह्मणांच्या सल्यानें, आणि दूरदर्शी मंत्रिमंडळाच्या साहाय्याने करावा, अशी पूर्वीच्या काळची मन्वाज्ञा आहे. न्यायाच्या कामी सभ्य लोकांची म्हणजे आसेसेर पंचाचे सहाय्य. किंवा ज़ूरर यांची मदत घेण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून प्रचारांत होती असें दिसतें. तथापि, कालांतराने ही अतिप्रशस्त चाल अगदी मार्गे पडल्याचें सांप्रतच्या स्थितीवरून, व हल्लीच्या भारतीय राजदरबारांत चालत आलेल्या संप्रदयावरून, चांगले व्यक्त होतें. मात्र इंग्रजी सत्ता ज्या ठिकाणीं आहे अशा मुलुखांत, हा प्रचार सर्वत्र सुरू आहे.
 न्यायासनावर बसल्यानंतर, राजानें फार शांतता व


१ व्यवहारान् दिदृक्षुस्तुब्राह्मणैः सह पार्थिवः ।
मंत्रज्ञैर्मत्रिभिश्चैव विनीतः प्रविशेत्सभाम् ॥ १ ॥

( म. स्मृ. अ. ८.)

२ सोऽस्य कार्याणि संपश्येत् सभ्यैरेव त्रिभिर्वृतः ।
सभामेव प्रविश्याप्रधामासीनः स्थित एववा ॥ १० ॥

( म. स्मृ. अ. ८)

 “Justice is to be administered by the King in person, assisted by Brahmins and other counsellors ; or that function may be deputed to one Brahmin aided by three assessors of the same class."

( Elphinstone's. India P. 49 ).