१० आर्याचें मूलनिवासस्थान, व त्यांचे वैभव.
११ आर्यांची सामाजिकरचना, व धर्मसंस्था. १२
आर्यभाषा, व तिचें श्रेष्ठत्व. १३ वेद, व वेदांगें.
आणि १४ महाकाव्यें, व गद्यपद्यादि भाषाशास्त्र.
३ तृतीय पुस्तकांत आर्येतिहास व भूगोल, याविषयीं-
चा वृत्तांत दिला आहे, व त्याचे पांच भाग केले आहेत:-
१५ इतिहास व भूगोलासारख्या ग्रंथासंबंधीं
आर्यांचें न्यूनत्व, व त्यांची कारणें. १६ वेदकालीन
इतिहास. १७ उत्तर हिंदुस्थांतील प्राचीन नृपा-
वलि. १८ दक्षिण हिंदुस्थानांतील प्राचीन नृपावलि.
आणि १९ प्राचीन आर्यभूगोल.
४ चवथ्या पुस्तकांत, आर्यशास्त्र व कला यांविषयींचे
सविस्तर विवेचन आहे, व त्याचे बारा भाग केले आहेत:-
२० धर्मशास्त्र. २१ वेदान्तशास्त्र. २२ ज्योतिः -
शास्त्र, भूमितिशास्त्र, अंकगणित, व बीजगणित. २३
वैद्यशास्त्र. २४ नीतिशास्त्र. २५ धनुर्वेद. २६ गांध-
र्ववेद अथवा गायनकला. २७ चित्रकला. २८ शिल्प-
कला व निर्माणविद्या. २९ पटचातुर्थ व रागकौशल्य.
३० वास्तुविद्या, यंत्रकला, गंधद्रव्यक्रिया, पाक-
शास्त्र, द्यूतचातुर्य, व इतर कला. आणि ३१ लेखनकला.
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )