पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
भारतीय साम्राज्य.

[ भाग


स्थावर जंगभात्मक द्रव्य अथवा मालाविरुद्ध अपराध. ४ बनावट दस्तऐवज अथवा कूटलेख, साक्ष्य, व न्यायाविरुद्ध अपराध.५ लोकांच्या स्वस्थतेविरुद्ध अपराध. ६ लोकांचे आरोग्य, सुरक्षितपणा, सोय, सदाचरण, आणि लज्जा, यां विरुद्ध अपराध. ७ अब्रू घेणे. ८ अपमान करणे. ९ धर्मा- विरुद्ध अपराव. आणि १० राजपुरुष अथवा सरकारी नोकर यांनी केलेले अपराध.
 सदहुँपैकीं, कांहीं अपराधांस निरनिराळ्या शिक्षा सांगितल्या असून कांहीस तर, गुरु- त्यांतील गुणदोव. लघुत्वाचें परिमाण यत्किंचितही म- नांत न आणितां, एकाच मालिकेत गोविल्याचे उघड दि- सतें. अपराधाच्या स्वरूपाप्रमाणे शिक्षेचें मान ठरविल्याचें कोठेही दिसत नाहीं. या कारणानें ही प्राचीन शासनप- द्धति फारच विसंगत भासते. शिवाय, अपराधास सांगि- तलेल्या कांहीं कांहीं शिक्षा देखील अवस्थेतील असल्याचें व्यक्त होते. अतिक्रूरे व रानटी त्यामुळे आर्यांची कु- शाग्रबुद्धि व त्यांचें नैसर्गिक औदार्य, ह्यांचा एतद्वि- षयक सारासार विचार करण्यांत कसा लोप झाला,


 १ ब्रह्मा च सुरापश्चस्तेयी च गुरुतल्पगः ।
 एते सर्वे पृथग्ज्ञेया महापातकिनो नराः ॥ २३५

( म. स्मृ. अ. ९. )

 २ म. स्मृ. अ. ८ श्लो ३५२, ३७७.
 ३ म. स्मृ. अ. ९ श्लो, २७७,