पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/131

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करितां आला. ६३० पासून ६४ ८ पावेतों या प्रांतांवर चिनी लोकांचे वर्चस्व होते. या वेळेस तिबेटचा राजा संग-त्संग-गंपो नांवाचा होता. त्याने इ०स०६३९ मध्ये ल्हासा शहराची स्थापना केली. देशांत बौद्ध धर्माचा प्रसार केला, व तिबेटी लिपी काढली त्याने नेपाळची राजकन्या भ्रकुटी हिच्याशी लग्न केलें; व दोन वर्षात ( इ० स० ६ ४ १ ) चिनी बादशहाची कन्या वेनशंग हिच्याशीही विवाह केला. त्या दोघीही बौद्ध धर्माच्या होत्या. त्यांचा त्या तरुण राजावर पूर्ण पगडा बसला व बौद्धांनी त्या राजाला अवलोकितेश्वर ( बुद्धाचा अवतार ) असा किताब दिला. नेपाळच्या राजकन्येस हन्तितारा व चिनी राजकन्येस धवलतारा असे किताब दिले. या विवाहासंबंधाने चीनची व तिबेटची चांगलीच दोस्ती झाली. ६६१ पासून६६५ पर्यंत चीनचा अंमल इराणापासून कोरियापर्यंतचा होता. पुढे तिबेटशी त्यांचा बेबनाव झाला, व सालांत तिबेटच्या लोकांनी चिनी लोकांचा मोठा पराभव केला. या वेळेस काश्गारिआ प्रांत चीन लोकांचे ताब्यांतून गेला. तो त्यांनी ६९२ साली परत घेतला इ० स० ७१३ पर्यंत तुर्क, अरब व तिबेटी लोकांशी चीनच्या लढाया चालल्या होत्या. त्या सालांत चीनचा बादशहा हि- उएन-त्मंग याने आपल्या पराक्रमाने या तिन्ही लोकांवर वर्चस्व मिळविले व त्याचा व काश्मिर प्रांतापर्यंत बसला. त्यांत काश्मिरचा राजा चंद्रापीड याला इ०स० ७२० मध्ये राजा हा किताब दिला. इ० स० ७७३ मध्ये चंद्रापीडाचा भाऊ मुक्तापीड लालतादित्य यासही त्याने तोच किताब दिला. परंतु चीनची ही भरभराटी फार दिवस टिकली नाही. ७५१ साली कलक लोकांच्या मदतीने अरब लोकांनी त्यांचा पूर्ण पराभव केला. या पराभवाचे वेळेस कांही चिनी कैदी समरकंद येथे आणून ठेवले होते. त्यांनी तेथे कागद कोरियापर्यंतचा हा १ पासून६६६ पानी व तिबेटचालत