पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/93

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वस्ती फक्त सुमारे एक हजार होती. हर्षराजानेही या शहराकडे लक्ष पुरविले नाही. पालवंशापैकी धर्मपाल राजाने मात्र त्या शहराचे जीर्णोद्धाराकडे थोडेसे लक्ष दिले. इ. स. ८११ साली त्याची तेथें राजधानी होती. पुढे इ० स० १९४१ पावेतों या शहराचें नांव लुप्तप्राय झाले होते. त्या सालाचे सुमारास शेरशहानें पांच लक्ष रुपये खर्च करून तेथे एक किल्ला बांधला. तेव्हांपासून बिहार शहराचे वैभव जाऊन पाटणा शहराचा भाग्योदय झाला. इ० स० १९१२ सालीं बिहार व ओरिसा ह्या प्रांतांचें तें मुख्य शहर झाले. हल्लींची बांकीपूरची वस्ती प्राचीन पाटलिपुत्र शहराचे जागी आहे. या चंद्रगुप्ताला विक्रमादित्यही म्हणत असत. त्याच्या वेळचे देशाच्या स्थितीचे वर्णन चिनी प्रवाशी फाहिएन याने चांगले लिहिले आहे. तो पाटलीपुत्र नगरांत तीन वर्षे राहिला आणि तेथे त्याने संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास केला. त्या . वेळेस महायान व हीनयान या दोन बौद्ध धर्माच्या प्रचाराचे मठ होते. त्या दोन्हींत मिळून ६००७०० भिक्षु होते. दरसाल वैशाख शुद्ध अष्टमीस एक मोठा समारंभ होत असे. त्या वेळेस वीस मोठमोठ्या रथांवर मर्ति बसवून नगरांत हिंडवीत असत. या रथांबरोबर गवई, वाजंत्री, वगैरे असून मिरवणूक मोठ्या थाटाची निघत असे. मगध देशांतील लोक संपन्न असून, दानधर्माकडे त्यांचे लक्ष फार असे. रस्त्यावर धर्मशाळा होत्या व मुख्य शहरांत धार्मिक नागरिकांनी एक उत्तम धर्मार्थ औषधालय स्थापिलें होतें. युरोप खंडांत अशा प्रकारचे पहिले औषधालय म्हणजे पारिस शहरांतील मासोंधु हे इ. स. चे सातवे शतकांत निघाले असे म्हणतात, ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. फाहिएनने सिंधु नदापासून मथुरेपर्यंत ५०.