भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ९७ रूनच, एतद्विषयक सर्व साधारण अथवा सामान्य सिद्धान्त एकसहा बांधण्यास खचितच मोठी अडचण वाटते. ह्याशिवाय, सदरहू उपपत्तीच्या संबंधाने दुसराही एक | महत्वाचा आक्षेप येण्याजोगा आहे. अनुकरणाचा अ- तो असा की, सष्टपदाथांचे केवळ अनपेक्षा, नुकरण करूनच मनुष्याचा सर्व कार्यभाग झाला, व त्याला भाषा देखील आली; नाहींपेक्षा, त्याचे सर्व प्रकारे अडून राहून, त्याला भाषा मुळीच आली नसती, असे बिलकुल म्हणता येणार नाही. कारण, श्रृंगार, हास्य, करुणा, वीर, विनोद, बीभत्स, इत्यादि नानाविध मनोविकार, त्याला केवळ अंगविक्षेपाने, किंवा अन्य तव्हेनें व्यक्त करून, आपले मनोगत दुसन्यांस अल्पस्वल्प प्रमाणाने, सहज कळविता येण्यासारखे आहे. आणि जर असे आहे, तर निष्कारण दुस-याची मदत घेण्याचे त्याला बिलकुल कारणच नव्हते व नाही, हे विशेष रीतीने सांगावयास नको. उदाहरणार्थ, हाहा ! ओहो ! वाहवा ! हे ! अहं ! अरेरे ! इश्श ! वाः ! इत्यादि अनेक विकारांनी आनंद, दुःख, शोक, व संमति व्यक्त करण्यास, आपल्यापाशीच उत्तम साधन असल्यामुळे, बाह्य, किंवा परकी, अथवा आगंतुक साधनांची आपल्याला काडीमात्र सुद्धा आवश्यकताच नाही, हे उघड आहे. याप्रमाणे, आपले विचार प्रदर्शित करण्यासाठी, सष्ट पदार्थांचे आणि विशेषतः प्राणित्याचे कारण. वर्गाचे अनुकरण करण्याची यर्किचितु देखील अपेक्षा नसून, आपल्या उद्गारांनीच आपलें
पान:भाषाशास्त्र.djvu/106
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही