या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ भाषाशास्त्र. खला. त्यावरून असे निःसंशय दिसते की, रामायणांतील दा• युगान्तरी सुद्धा, भरतखंडालाच काय ते एकान्त विश्रान्तीचे स्थान मानीत असत. इतकेच नव्हे तर, देवादिकांस देखील तेच एक निवासस्थल होऊन राहिले होते. कारण, येथेच तपश्चर्या करण्यासाठी, वामन अवताराच्याही पूर्वी, विष्णूने एक पवित्रस्थान शोधून काढून, तेथे तपश्चर्या केली, व तेच पुढे सिद्धाश्रम नावाने सुप्रसिद्धीस आले, अशाविषयों एक आख्यायिका आहे. इह राम महाबाहो विष्णुदेव नमस्कृतः ।। वषाणि सुबहूनह तथायुग शतानि च ॥ २ ॥ तपश्चरण योगार्थमुवास सुमहातपाः ।। एषपूर्व श्रमोराम वामनस्य महात्मनः ॥ ३ ॥ ( रामायण. बालकाण्ड, सग २९. ) सर्वात प्राचीनतर प्रमाण म्हटले ह्मणजे ऋग्वेदांतील होय. सबब, तेच विशेष महत्वाचे ऋग्वेदांतील पुरावा. उ: जाणून तिकडे क्षणभर वळू, आणि आम्हा आर्यांचे भरतखंड हेच अनादि कालापासूनचे निवासस्थान आहे, अशाबद्दलचा कांही दाखला मिळाला तर पाहूं. ऋग्वेदांतील एका ऋचेत असे झटले आहे की, इन्द्राने आर्यासाठी, पाणी, आपल्या उज्ज्वल मित्रांसहित - भूमि, व प्रकाश, यांची यस भूमि, सूर्य, आणि पाणि दिले. निर्मिती. सनत्क्षेत्रसखिभिःश्वित्न्येभिःसनसुर्यसनदपःसुवज्रः ( १. १००. १८.)