ई भाषेचे उद्गमस्थान. ११७ ह्यावरून, असे उघड होतें कीं, इन्द्राने निर्माण केलेल्या भूमीतच आह्मी उत्पन्न होऊन, सृष्टपदार्थांचे यथार्थ अव. लोकन होण्यासाठी, त्याने आह्मांला सुर्याचा प्रकाश दिला, राहण्याकरितां जागा दिली, व पिण्यासाठी पाणी दिलें. आतां, इन्द्र ही केवळ आर्यहिंदूंचीच देवता असून, तिचा प्रत्यक्ष संबंध केवळ भरतखंडाशच असल्यामुळे, आह्मी भरतभूमीतच उत्पन्न झाल असल्याचे निर्विवाद होते. परंतु, कोणी कदाचित् अशी शंका घेईल की, फक्त सदरी नमुद केलेल्या ऋचेवरूनच हिंदू हे भरतखंडांतच प्रथम निर्माण झाले, असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाहीं. सबब, ह्या म्हणण्याच्या विशेष पुष्टीकरणार्थ, आणि आमच्या प्रतिपादनाचे योग्य रीतीने समर्थन व्हावे यासाठी, आणखी एका ऋचेचा आधार वाचकांपुढे ठेवितो. ( स वृत्रहा इन्द्रः ) अजनयद् मनवे क्षामपञ्चत्यादि। । (ऋ. वे. २, २०, ७ ) ह्मावरून, इन्द्राने मनूसाठी भूमि व पाणी उत्पन्न केल्याचे उघड होते. इतकेच नव्हे तर, मनु हा सर्व आर्यशाखांचा, किंबहुना अखिल मानवी कुटुंबाचा. प्रपितामह आणि जनिता असल्याकारणाने, व मनु, इन्द्र, आणि भरतभूमि, यांचा निकट व अनादि संबंध असल्यामुळे, आम्ही भरतखंडांतच जन्म पावलों असल्याचे निःसंशय ठरते. . तथापि, कित्येक विद्वान आणि बहुश्रुतवाचक हे याही ऋचेवर आक्षेप घेतील, व असे प्रतिपादन करतील की, ज्यापेक्षां सदरहु ऋचेत भूमीचा उल्लेख नाही, त्यापेक्षा केवळ मनु अथवा इन्द्र शब्दावरूनच आर्यांची जन्मभूमि
पान:भाषाशास्त्र.djvu/126
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही