१५६ .. भाषाशास्त्र... - तथापि, आम्ही पूर्वी विवेचन केल्याप्रमाणे, सर्व शास्त्रीय | शोधांचा विचार करतो असे वाटते तद्विषयक प्रमाण. की, हा भूगोल कालान्तराने निर्वत गेल्यावर, त्याजवरील हिमाचलासारखे उच्च प्रदेश खुले पडून, त्याच्या आसमंतांतील व दक्षिणेकडील निम्नप्रांत देखील शनैः शनैः पाण्यावर आले. पुढे, ह्या निम्नभागांत म्हणजे आयवत्तंति, जीवनानुकूल परिवेष्टन तयार झाल्यावर, तेथे मानवी प्राणी जन्मला, आणि तोच आर्य नामधेयाने कालान्तराने प्रसिद्धीस आला. येथूनच त्याने दिगन्तरी पर्यटन केले, व उत्तरध्रुवाजवळीलही प्रदेशांत जाऊन, तेथे मुद्धा त्याने अनेक प्रान्त वसविले. । आतां, हिमाचल व त्याचा निम्नभाँग, हा पाण्याच्या सपाटीवर येऊन ज्या वेळी कोरडा शास्त्रीय, | पडत चालला, त्या वेळीं उत्तरध्रुवाकडे वस्ती असण्याचा बिलकुल संभवच नव्हता. कारण, तो फारच निम्न प्रदेश असल्यामुळे पाण्यांतच असे, आणि याच कारणानें तो भूचर प्राण्यांच्या वस्तीस व जीवनाला अगदी अनुकल नव्हता, हे उघड आहे. अर्थात् , मानव प्राण्याची प्रथमची वस्ती आर्यावर्त • नांवाने सुप्रसिद्धीस आलेल्या हिमालयाच्या दक्षिण प्रदेशांतच झाली; आणि येथूनच आमचे आर्य पूर्वज पूर्व, १ मागे पान १२७।१२८ पहा. २ Geikie's Physical Geography. ( P. 105 ). Geikie's Geology. ( P. 126 ). ३ जो कालान्तरानें आर्यावर्त्त अथवा भरतखंड या नावाने सर्वोस मरार झाला.
पान:भाषाशास्त्र.djvu/165
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही