या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्यनामधेयाची सार्वत्रिक मुद्रा. १८१ निक्स् (Nyx), आणि सूर्याचे हिलिआँस् (Helios ), असे रूपान्तर झाले आहे. भग शब्द पुराण इराणी भाषेत । बग, व पुराण स्ल्यहाँनिक भाषेत बोगू ( Bogu ), असा झालेला आहे. वरुणाचा ग्रीक भाषेत युरेनस् ( Uranus ), वाताचा वोट ( Wotan ), वाक्चा व्हॉक्स् (Vox), मरुत्चा मार्क्स (Mars), अयसचा ल्याटिन भाषेत एरिस (Aeris), पुराण जर्मन भाषेत एर ( Ev ), अर्वाचीन जर्मन भाषेत इझन् ( Eisen), गाँथिक भाषेत एस, इंग्रजीत आयर्न ( Iron ), असा अपभ्रंश झाल्याचे नजरेस येते. त्याचप्रमाणे, पर्जन्य शब्द लेटिश भाषेत पर्छनॅस ( Perkunas ), पुराण प्रशियन भाषेत परक्युनॉस् (Perkunos ), पुराण स्ल्यव्हॉनिक भाषेत पेरून (Perun ), पोलिश भाषेत पायोरन् ( Piorun ), आणि बोहोमियन भाषेत पिरॅन् ( Piraun ), या रूपान्तराने आढळतो; व सदरहू भाषांत, या पर्जन्य शब्दाचा अर्थ मेघगर्जत अथवा मेघदेवता असा होतो. ह्या पर्जन्य शब्दाचे स्थियन्तर, त्याचे स्थलान्तर, व अपभ्रंशाने झालेले त्याचे रूपान्तर, हीं मनांत आणिली झणजे, असे भासमान होते की, जो दृष्टिवाचक शब्द सुमारे आठ दहा हजार वर्षांपूर्वी आमच्या आयनीं भरतखंडांत मेघप्रसादार्थ वापरला होता, तोच शब्द कांहीं अपभ्रंशाने, परंतु तदर्थवाचकच, यूरोपखंडांत सुद्धां, केवळ गेल्या शतकापर्यंतही प्रचारांत होता. आणि ही गोष्ट १ हा अपभ्रंश सकाराच्या ऐवजी हकार, आणि रच्या ऐवजी ल होऊन, झाला आहे. १६