. . . . . . । । भाग पांचवा. भाषाशास्त्राच्या संबंधाने आमच्या आर्यपूर्वजांचे प्राकालीन परिश्रम, व पौरस्त्य प्रयत्न, मागील भागांत शब्दांची व्युत्पत्ति, त्यांचे स्थलान्तर, भाषाशाखासंबंधी व त्यांचे रूपान्तर, यांविषयींची आमच्या आर्यपूर्वजां- अवश्य ती माहिती दिली. सबब, प्रचे परिश्रम, स्तुत भागांत, भाषेच्या संबंधानें अथवा भाषाशास्त्रविषयक, आमच्या पूर्वजांनी कोणत्या प्रका: रचे कसे परिश्रम केले, आणि त्या कामांत त्यांना कितीसे यश आले, याबद्दलचे तपशिलवार विवेचन करण्याचे योजिले आहे. भाषाशास्त्राच्या विवेचनांत, मुख्यत्वेकरून तीन गोष्टींचा अन्तर्भाव होतो. १ व्याकरण, २ कोशरचना, आणि ३ साहित्य, पहिल्यांत, अर्थाविष्करण, वाक्यावबोध, व शब्दव्युत्पत्तिमीमांसा, इत्यादींचा तपशील असतो. दुसः न्यांत, शब्दसंग्रहासंबंधी वृत्तान्त येतो. आणि तिस-यांत, छन्द, काव्य, व अलंकार, वगैरेचे वर्णन असते. यासाठी, त्या सर्वांचा आपण क्रमशः विचार करू.
पान:भाषाशास्त्र.djvu/194
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही