या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. १८९ ब्राह्मणानन्तर, शब्दमीमांसाविषयक असा मुख्य आणि महत्वाचा ग्रंथ म्हटला म्हणजे, प्रातितदनतर प्रीति शाख्य होय. ह्याचा प्रधानहेत वेदाशायें, क्षराचे शुद्धोच्चारण, पदाध्ययन, संधिनियमन, आणि यथार्थ स्वररक्षण, इतकाच असावा, असे स्पष्ट दिसते. सर्व प्रातिशाख्यांत, ऋगवेदाचे प्रातिशाख्य पुराणतम आहे. सबब, त्यांतील अवश्य ते अवतरण येथे देतो. म्हणजे, त्यावरूनच त्यांतील विषयाचे दिग्दर्शन सहजीं होईल, गुरुत्वं लघुता साम्यं हस्वदीर्घप्लुतानि च ।। लोपागमविकारश्च प्रकृतिविक्रमः क्रमः ॥ ५ ॥ स्वरितोदात्तनचत्वं श्वासो नादस्तथोभयम् । एतत्सर्वं च विज्ञेयं च्छांदोभाषामधीयता ॥ ६॥ | ( ऋग्वेदप्रातिशाख्यसूत्र. ) हल्ली उपलब्ध अशी चारच प्रातिशाख्ये आहेत. १ ऋगवेदांतील शाकल शाखेचे प्रातिशाख्य; हे शौनकाने केले आहे. २ कृष्णयजुर्वेदांतील तैत्तिरीय शाखेचे प्रातिशाख्य. ३ शुक्लयजुर्वेदांतील वाजसनेय गोत्रापैकी माध्यंदिन शाखेचे प्रातिशाख्य; ह्याला वाजसनेय प्रातिशाख्य देखील म्हणतात; व ते सुप्रसिद्ध वार्तिककार जो को - ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) तसेच वेबरही असे लिहितो की :-We thus find in them ( Baralumns ) the oldest rituals we have, oldest the oldest linguistie, explanations, the traditional narratives, and the oldest philosophical speculations." । | ( History of Sanskrit Literature..P. 12 )