या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११
सामान्यविवेचन व दिग्दर्शन.



ते असें समजतात कीं, भाषेची अवस्था व तिचे अस्तित्व, हीं केवळ यादृच्छिक असून, तिची घटना देखील अगदी स्वतंत्र आहे. मॉक्समुलर तर भाषाशास्त्राची गणना पदार्थविज्ञानशास्त्रांतच करतो. परंतु, व्हिट्नेला ती गोष्ट मुळींच संमत नाहीं.

 व्हिट्नें म्हणतो कीं, भाषाशास्त्राची गणना पदार्थविज्ञानांत होत नसून, ती मानवी प्राण्यानें केलेली एक संस्थाच आहे. मात्र, मनुष्य कृतीच्या अनेक संस्कारांनी तीत फेरफार होण्याचा संभव असतो; आणि तो कालान्तराने निःसंशय होतो, हे कोणालाही कबूल केले पाहिजे.

त्या संबंधाने पाश्चात्य पंडितांचा अभिप्राय.

 इंग्लंदांतील भाषाशास्त्राचा दुय्यम पंडित जो सेस, त्याचें असें मत आहे कीं, भाषा म्हणजे केवळ स्वरसंक्रमच होय. ह्यांतच सांकेतिक चिन्हात्मक वर्णभि


 १ ( I claim ) "for the Science of Language a place among the physical sciences." (Max Muller Sc. of Language. Lectures. vol. I. P.P. 30/91. )

 २ "Language is not a physical product, but a human institution, preserved, perpetuated, and changed, by free human action." "To ascribe the difference of language and linguistic growth directly to 'physical Causes,' to make them dependent on 'peculiarities of organization,' whether cerebral, laryngal, or other, is wholly meaningless and futile." ( Whitney's Language and the Study of Language. P. 152 ).

 ३ A. H. Sayce. Deputy Professor of comparative phylology in the University of Oxford's "Introductian to the Science of Language. vol. I. P. 90