या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २१५ आम्हां लोकांस गौरकाय हे किती क्षुद्र व तुच्छ मान तात, याचा अनुभव सर. जॉन मामालकमूचा स्वतः वतः लकम् यांस स्वतःचाच असल्या काचा अनुभव. रणाने, त्यांच्या लेखांतील अवश्य तो उतारा येथे दिला तर, अप्रासंगिकपणाचा दोष येणार नाही, असे समजून तो देतो. ते म्हणतात की,

  • माझी स्वतःची एतद्देशीय लोकांविषय पहिल्याने काय समजूत होती, ती अजून मला आठवते; व ती आठवली असतां माझी मलाच मोठी शरम वाटते ! ती ( समजूत ) अशी होती की, माझ्या हाताखाली जे नेटिव्ह कामगार आहेत, ते माझ्यापेक्षा सर्व प्रकारे किती हलके आहेत! असे मला बरेच दिवस वाटत असे. पण, जसजसे येथील लोकांविषयीं व माझे स्वतःविषय मला अधिकाधिक कळू लागले, तसतसा आमच्या मधील भेद कमी कमी होत गेला. आमचे इंग्रज लोक आपल्या श्रेष्ठपणाचा मोठा डौल मिरवितात, हे मी पुष्कळ ठिकाणी पाहिले आहे; व ऐकिलेंही आहे. पण यूरोपांतील व हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रतीच्या लोकांची त्यांच्या त्यांच्या मानाने परस्पर तलना केली तर, तिकडच्या लोकांत गर्व मिरविण्यास मोठे कारण दिसेल असे वाटत नाही. तसेच, सगळ्या हिंदूविषयी एकंदर सरसकट जें मत ज्याच्या त्याच्या तोंडून ऐकू येते की, ते. सारे लोक येथून तेथून लुच्चे लबाड आहेत; त्यांची भल्याने संगत करूं नये; आणि ते बुद्धचे इतके मंद आहेत की, विद्याभ्यासाच्या योगाने ज्यांची मने विशाल व उदार झाली, अशा युरोपियन लोकांच्या संभाषणास व स्नहास ते अगदी लायक नाहीत; हेही मला बिलकुल मान्य नहीं,

१ निबंधमाला पहा.