या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न २३५ इत्यादि होत. वैय्यटाची' पतंजलीवर भाष्यप्रदीप नांवाची टीका असून, ह्या टीकेवरही नागोजीभट्टानें भाष्यप्रदीपोद्द्योत नांवाची व्याख्या केली आहे. परिभाषेन्दुशेखर नांवाचा ह्याचा आणखीही एक ग्रंथ आहे, व ह्याचे डा. कीलहानने भाषान्तर केले आहे. ह्याचाच शब्देंदुशेखर नांवाचा ग्रंथ सिद्धान्तकौमुदीवरील टीका दाखल होय. लघुशब्देंदुशेखर हा देखील ह्याचाच ग्रंथ आहे. वामनाने काशिकावृत्ति नांवाची पाणिनीवर व्याख्या केली असून, तो इ. स. च्या आठव्या शतकांत उदयास आला असावा, असे वाटते. कारण, राजतरंगिणींत तो गयौपाडाच्या कारकीर्दीतील असल्याविषयीं वर्णन आहे, आणि इतर पंडितांच्या मालिकेत कल्हणानें वामनासँही गावले आहे. क्षीर ( धातुतरंगिणीचा कर्ता ) हा सुद्धा १ हा इ. स. च्या सातव्या शतकांतला असावा, अशी वेबरची सूचना आहे. ( H. I. L. P. 223 ). २ इ. स. चे १८ वे शतक. ३ हा राजा विद्येचा मोठा पोर्षिदा असल्याचे राजतरंगिणीवरून दिसते. समग्रहीत्तथाराजा सोन्विष्यनिखिलान्बुधांन् । विद्वदुर्भिक्षमभवद्यथान्यनृपमंडले ॥ ४९३॥ ( रा ० त० चौथा तरंग. ) ४ सदामोदर गुप्ताख्यं कुट्टनमतकारिणम् । कविं कविं बलिरिव धुर्य धीसाचवं व्यधात् ॥४९६॥ मनोरथः शंखदत्तश्चटकः संधिमांस्तथा । बभूवुः कवयस्तस्य वामनाद्याश्चमंत्रिणः ॥ ४९७ ॥ | ( रा. त. चौथा तरंग.) । ५ हा जैन किंवा बौद्ध मताचा असावा, असे वाटते.