या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २४९ उल्लेख करून, * व्याडेः सर्वत्राभिधानलापः' । असे वचन घातले आहे. यावरून, प्रातिशाख्यापूर्वीचाही व्याडी असल्यामुळे, त्याचे प्राचीनत्व वाचकाच्या लक्षांत सहजीं येईल. | सर्व कोशांत, अमरिसंहाचा अमरकोश हा अग्रणी असून, फारच प्रसिद्ध आहे. सबब, तत्संबंधी अवश्य ती माहिती येथे देतो. अमरसिंहाचा काल अजूनही निश्चित नाही. कारण, कोणी म्हणतात की, तो विक्रम राअमरसिंहाचा काल. जाच्या नवरत्नांपैकी एक होता, व कांहींचे असे मत आहे की, ते इ. स. च्या सहाव्या शत. कांतला असावा. पहिली गोष्ट खरी असल्यास, तो इ. स. पूर्वी ५६ वर्षांच्या सुमारासच उदयास आला पाहिजे. कारण, तोच आत विख्यात विक्रम राजाचा काल होय. ह्या नामांकित राजाच्या दिव्य सभेत, ज्ञानतेजानें सदैव चमकणारी रत्ने खाली लिहिल्याप्रमाणे असतः-- धन्वतरिः क्षपणकोऽमरसिंहशंकू वेतालभट्टघटखर्परकालेदासाः । । ख्यातो वराहमिहिरो नृपतेः सभायां । रत्नानिवै वररुचिर्नव विक्रमस्य । अमरसिंह हा बौद्धधर्मानुयायी असल्याचे पुष्कळाचे

मत आहे. ह्याने केलेल्या कोशाच अमरकोशांतील वि- तीन विस्तृत कांडे आहेत. सबब, पयानुक्रम.

त्यांतील विषयानुक्रम खाली लिहिल्या प्रमाणे देतों.