भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न २५५ चालली; दुसरे असे की, त्या योगाने देशी भाषांचा फैलाव होण्यास विलक्षण प्रोत्साहन मिळाले; व तिसरें हें कीं, ह्या । भाषा संस्कृतापासूनच उद्भवल्या असल्यामुळे, मूळ शब्दांत कसकसे स्थित्यन्तर आणि रूपान्तर होत गेले, हे समजण्याला चांगले साधन उपलब्ध झालें. इ. स. पूर्वी तिस-या शतकांत, कित्येक बौद्ध धर्मोपदे ... शक बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी, बौद्ध धर्मोपदेशकांचे भरतखंडांतून चिनांत गेले होते. तेथे चिनांत गमन. | जाऊन दाखल झाल्यावर, ते केवळ वरवरच धर्माचा उपदेश करून स्वस्थ बसले, असे नाहीं. तर, त्यांनी ठिकठिकाणी देवालये बांधिली, व त्यांत बुद्धाच्या मतसुद्धां बसविल्या. ह्याचे प्रयन्तर आपल्याला चिनी ग्रंथांतही आढळून येते; आणि इ. स. पूर्वी २१७ सालांत तर, ती गोष्ट चिनी बखरीत देखील नमूद केलेली दृष्टीस पडते. शिवाय, इ. स. पूर्वी १२० वर्षांच्या सुमारास, गोबीच्या उत्तरेस व अजूबाजूलाही, बौद्धधर्माचा बराच प्रसार झाला असल्याचे उघड होते. कारण, गोबी नामक वालुकामय प्रदेशाच्या उत्तरेकडील टापूंत राहणा-या रानटी लोकांचा पराभव एका चिनी सरदाराने केल्यावर,जयाचन्हांचे सूचक म्हणून बुद्धाची एक सुवर्णमूर्तिच त्याने तिकडून आणिली होती. बद्ध म्हणजे केवळ परब्रह्मच होय, अशी चिनी लो | कांची समजूत आहे. आणि म्हणूनच बुद्भाविषयी चिनी ते त्याला फोटुफो म्हणतात. चिनी लोकांची पूज्यबुद्धिभात ब्रह्माला फान अशी संज्ञा आहे. तथापि, फान् हा “फान्लान्-मो चा अपभ्रंश अस
पान:भाषाशास्त्र.djvu/262
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही