या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २६१ अकबरच्या कारकीर्दीत तर, संस्कृत भाषेचा याहीपेक्षा अकबरच्या कार- विशेष रीतीनेच फैलाव झाला. ह्याने इ. कीर्दीत संस्कृतास प्रो- स.१९९६ पासून १६ ०९ पर्यंत राज्य त्साहन. केले, आणि जरी तो जन्मतः मुसलमान होता, तरी तो धर्मवेडा नसल्यामुळे, सर्व धर्मातली मुख्य तत्वे जाणण्याची त्याला मोठी हौस असे; व त्यांतही खरे काय आहे, याचा तो निरंतर शोध करी. त्यायोगानें, हिन्दु, मुसलमान, पारसी, यहुदी, आणि ख्रिस्ती, वगैरे नानाविध धर्माचे तो मोठ्या अगत्याने परिशीलन करी, व त्याच कारणानें, सर्व धर्मातील लोकांस त्याचे दरबार खुलें असे. अकबराला स्वतः लिहिता वाचतां येत नव्हते. तथापि, मा. तो मोठा रसिक होता. त्यामुळे, रामायण, महाभारत, इत्यादींचे भाषा- रामायण, महाभारत, अमरकोश, न्तर. आणि दुसरे उत्कृष्ट संस्कृत ग्रंथ, यांचे इराणींत भाषान्तर करण्याविषयी, त्याने हुकूम केला. हजी इभ्राहीम शिरहिन्दीने अर्थववेदाचेही भाषान्तर केले. परंतु, सामवेद, यजुर्वेद, व सर्वांत पुराणतम आणि श्रेष्ठतम जो ऋग्वेद, त्याचे भाषान्तर मुळीच होईना. कारण, त्याची पवित्रता, व त्याचे अपौरुषत्व, ही ब्राह्मणांच्या, किंबहुना अखिल हिंदुराष्ट्राच्याच हृत्पटिकेवर विलक्षण रीतीने बाणली असल्यामुळे, ते त्याचा अर्थ प्रकट करण्यास हरे 1 Mullbauer: Catholic Mission. s. 134. 2 Eliots Historions of India. P. P. 248. 259-260. 3 Max Mullers History of Ancient Sanskrit Literature. P. 327.