या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. २७९ यू = उ. Put, यू = यू. Union. Universe. | वा यूचे देखील दोन उच्चार होतात. वाय् = इ. Sympathy. Syntax. वाय् = आय. Synod. शिवाय, इंग्रजीत शुद्ध स्वर आणि संयुक्त स्वर, असा | कांहींच भेद नाहीं. एवढेच नव्हे तर, इग्रजाताल यज- 1 (आय), U (य), व y (वाय), नात्मक स्वर. | यांची स्वरांत कां योजना केली, हेही समजत नाही. कारण, स्वर म्हणजे ध्वनिविमोचन, अथवा ध्वनीचा उद्गार असून, ज्या अक्षराचा उच्चार ह्या स्वराच्या साहाय्यावांचून होत नाही, त्यास व्यंजन म्हणावयाचे. अर्थात, जे अक्षर परप्रकाशित आहे, किंवा जे केवळ अन्याच्या साह्यानेच व्यक्त होणारे आहे, ते व्यंजन समजून, तद्व्यतिरिक्त बाकीचे सर्व स्वर होत, हे उघड आहे. । आतां, इंग्रजीतल्या आय् स्वरांत, यू हे उत्तरपद व्यंजनात्मकच आहे. तसेच, यू स्वराचा व्यवच्छेद केला तर, त्यांत य् + ऊ अशा दोन पदें उपलब्ध होऊन, त्यापैकी य हे व्यंजनच असल्याचे दृष्टीस पडते. आणि वाय् स्वरांत, ( व् + आ + य अशा ) स्वरयुक्त दोन व्यंजनेच दृग्गोचर होतात. तात्पर्य, हे तिन्ही व शास्त्रदृष्टया स्वर नसून, स्वरयुक्त व्यंजनेच आहेत, असे ह्मणणे प्राप्त येते. पण, ह्याखेरीज, आणखी एक गोष्ट विशेष रीतीनें लक्षात ठेवण्यासारखी आहे. ती ही की, सदरहू स्वरांशिवाय, बाकी जे ए (A), ई (B), ओ (O), हे स्वर राहिले आहेत,