२८६ भाषाशास्त्र. रीतीने अथवा ठरीव पद्धतीने उच्चार करण्याला एकही साधन उपलब्ध होत नाही. तेव्हां अर्थात् च, अमुक वर्णाचा असा उच्चार करावा, किंवा तसा करावा, याविषयी सहजींच भ्रांति उत्पन्न होऊन, वर्णमल्याबद्दल आपोआपच संदिग्धता राहते. उदाहरणार्थ, Earth, Clerk, Ear, Even, Ebb, असे ईचे पांच उचार होतात. अशा प्रकारची पुष्कळच उदाहरणे आह्मां पूर्वी दिली आहत; सबब, तद्विषयक आतां ज्यास्त ऊहापोह करण्याचे प्रयोजन दिसत नाहीं. ( मागें पान २७८ ते २८१ पहा.) ९ अनुच्चारता अथवा निरर्थकत्वाचा दोष ह्मटला ह्मणजे, पदांत किंवा शब्दांत अमुक अनुचारता किंवा निरर्थकता. एक वणचे सानिध्य असतांही तो वर्ण उच्चारण्यात येत नाही, व . केवळ अलिप्तच राहतो. जसे Calm, receipt, Sign, Eiglot. इत्यादि. ह्यांत एलू ( L), पी (P), जी (G), आणि जी एच ( G H ), हे वर्ण अगदीं सन्निध व शब्दांतल्या शब्दांत असून देखील, त्यांचा उच्चार होत नाहीं; आणि ह्मणूनच त्यांचे निरर्थकत्व सहज दिसून येते. ६ सहावा दोष म्हटला म्हणजे, वर्णोच्चाराचे वर्णमूल्यावर्णोच्चाराचे वर्ण । । हून भिन्नत्व असून, तो अनेक वर्णात मूल्याहून भिन्नत्व." व्यक्त होतो. उदाहरणार्थ F, H, I, | L, M, N, R, S, X, Y, Z, या वणांचा उच्चार अनुक्रमें, एफ, एच् , आय् , ए, एम्, एन्, आर् , एस् , एक्स्, वायू , आणि झड्डु, असा असून, त्याचे मूल्य मात्र फ, ह, झ, (अ, आ + इ, आय्, इ, ई, ), ल,
पान:भाषाशास्त्र.djvu/295
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही