या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२६ भाषाशास्त्र. उंबरांतील कीटकांस ज्याप्रमाणे उंबरहेंच अखिल जगत् वाटते, त्याचप्रमाणे ग्रीक लोकांसही झाले होते. शिवाय, पाश्चात्य देशांत, त्यांजवर कोणाचीच सरशी होऊन प्रकाश न पडल्याने, वासरांत लंगडी गाय शहाणी, या ह्मणीस अनुसरून, आपणच कायते सर्वांत श्रेष्ठ, असे त्यांस वाटू लागले होते. त्यामुळे, उघडच, अहंभावाने त्यांच्यांत हे हे ह्मणतां प्रवेश केला, आणि ह्या गच्या पांडेचा त्यांच्यावर तत्काल परिणाम झाला. त्यांनी सर्वस तुच्छ मानण्याचे आरंभिले, व ग्रीकेतर भाषांस तर जंगलीच ह्मणण्याची सुरुवात केली. त्या योगाने, अन्य भाषांतून कांहीं एक घेण्यासारखे नाही, असे त्यांजला भासत जाऊन, ते निव्वळ अर्ध्या हळकुंडानेच पिवळे झाले. कित्येक पाश्चात्यांची ही अशा प्रकारची स्थित पाहून, भर्तृहरि कवीच्या सुभाषिताची आठवण होते, आणि त्यांतील विचारतत्व खरोखरच आपल्या प्रत्ययास येते. तो म्हणतो, यदाकंचिज्ञोऽहं द्विपइव मदान्धः समभवम् । तदासर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तमममनः । यदाकिंचित्किंचिद्भुधजनसकाशादवगतम्। तदामूर्खास्मीतिज्वरइवमदोमेव्यपगतः ॥ | ( नीतिशतक ) शिवाय, पाश्चात्य देशांत भाषाशास्त्र मागासण्याला आणखी 9 Vide Ockley's History of the Saracens. ( मार्गे पान २१६-२१७ पहा. )