या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग नववा. व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद, अथवा नामचधातुजमाह आणि प्रतिपादक मीमांसा. प्रस्तुत भागांत, शब्द कसा बनला, म्हणजे त्याची उ । त्पात्त धातूपासून झाली, किंवा तो शब्दमीमांसा. स्वयमेव सिद्ध आहे, याविषयींचे तपशिलवार विवेचन करण्याचे योजिले आहे. आतां, शब्द म्हणजे काय, हे आम्ही पूर्वीच सांगितले | असून, त्याची व्याख्याही मागील भागांत शब्दाची व्याख्या. दिली आहे; (मार्गे पान १०५६ पहा). त्यावरून, ज्या ध्वनीच्या योगाने वस्तु, विकार, स्थिति, मनोवृत्ति, संज्ञा, इत्यादींचा बोध होतो; अगर, ज्यामुळे कोणत्याही पदाचा अर्थ, (म्हणजे उघडच कोणताही पदार्थ,) व्यक्त | १ व्याकणरीत्या पदाचा अर्थ म्हणजेच पदार्थ समजावयाचा आहे. मात्र, व्यवहारांत, ह्याच अर्थाने त्याचा नेहेमी उपयोग कर ण्यांत येत नसतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. - वैशेषिकांच्या मते, १ द्रव्य, २ गुण, ३ कर्म, । सामान्य, ५ विशेष, आणि ६ समवाय, असे सहा पदार्थ आहेत; व त्यांचीच संख्या २५ असल्याचे सांख्य मानतात. तथापि पातंजलीच्या ( पुढे चालू )