व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३६३ उपयोग केल्याने, अगदी नाहीसे होते. एवढेच नव्हे तर, त्या योगाने त्यांस पुष्कळ अंशाने माधुर्यच प्राप्त होते, असे देखील म्हणण्यास काडीमात्रही हरकत नाही. - आमच्या पौरस्य आणि त्यांतही भारतीय रसिक कविजनास आणि प्रचंड पंडितसमूहास, ह्या समासांचे विशेष कौतुक वाटावे, यांत तर कांहींच नवल नाही. पण, पाश्चात्य विद्वान व नावाजलेले इतिहासकार यांजला सुद्धा, आमच्या संस्कृत भाषेतील एकंदर समासरचनेचे महदाश्चर्य वाटते. ह्या संबंधाने विवेचन करीत असतांना, तत्संबंधीं पाश्चात्य एलफिस्टन् इतिहासकार असे लिहिमत. तात की, * Among many marks of high polish ( of San. ekrit ) is one which must have particularly promoted the melody of its versification. This consists in what Mr. Colebrooke callsits euphonical orthography by which letters are changed not only so as to avoid harsh combinations in particular words, but so as to preserve similar harmony throughout the whole length of each of their almost interminable compounds, and even to contribute to the music of vhole periods, which are generally subjected to those modifications, for the sake of euphony, which in other languages are confined to single words. " ( Elphinstone's History of India. vol.I. P. 282-283. ) पौरस्त्य अभिप्राय, पाय दंडी कवीने तर, अशा प्रकारच्या व भारतीय कविकुला- समासरचनेला गद्याचे केवळ जीविवतंसाचं मत. तच ह्मटलें आहे.
पान:भाषाशास्त्र.djvu/372
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही