व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३७७ धातूस शब्दांची किंमत किंवा प्रातिपांटूचे मत. पदिकांचे मूल्य आहे, असे समजत नाहीं. अर्थात्, तो धातूंस प्रधानत्वाने मानीत नसून गौण मानतो, हे उघड आहे. । कित्येक पाश्चात्य पडित सदरहू दोन्ही मार्ग सोडन देऊन, तिस-याच मार्गाचे अवलंबन हंचारवोपपत्तिवाद. करितात. त्यांचा अभिप्राय असा आहे की, मानवी प्राण्यांचे शब्द केवळ अनुकरणानेच बनले; व ह्या शब्दसमुच्चयाचीच भाषा झाली. म्हणजे, ह्या विशाल सृष्टीतील पंचमहाभुते, तिच्यांतील नानाविध पशू, अनेक पक्षी, आणि असंख्य प्राणी, यांचे भिन्न भिन्न शब्द ऐकल्यानेच त्याची भाषा तयार झाली. किंबहुना, मेघांचा गडगडाट, विजांचा चकचकाट, वा-याचा सोसाटा, गाईचे हंबरणे, घोड्याचें खिंखाळणे, कुत्र्याचे भोंकणे, पक्षांचे कूजित, इत्यादि ध्वनींचा मनुष्यमात्राच्या श्रवणपुटावर संस्कार होऊन, त्या त्या नादांचे त्याने यथामति व यथाशक्ति अनुकरण केले, आणि त्याचाच शब्द बनला. अशा प्रकारच्या शब्दोपपत्तीला आम्ही हंबारवेोपपत्ति असे नामधेय दिले आहे. ( मागे पान ९६ पहा ). परंतु, शदोत्पत्तीची ही कल्पना सयुक्तिक दिसत नाही. कारण, शब्दाच्या उपपत्तीचे फक्त अनुकरणे हेच एक साधन र (Herder ) प्रभृति. परंतु, कालान्तराने हर्डरने आपण होऊनच ह्या मताचा त्याग केला असल्याचे दिसते. हे अनुकरण सर्व देशांत, सर्व राष्ट्रांत, किंवा सर्व भाषांत, कसारखे नसुन, ते केवळ अनेक राष्ट्रांच्या भिन्न भिन्न कल्पना ( पुढे चालू. )
पान:भाषाशास्त्र.djvu/386
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही