या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૮૨ भाषाशास्त्र. आपल्या प्राकृत व्याकरणांत केला आहे. तथापि, कित्येक ठिकाणी बरेच अपवादही आढळून येतात. परंतु, ह्या अपवादांनीच सामान्य नियमांची व्याप्ति सिद्ध होते, हे कोणालाही कबूल केले पाहिजे. । अस्तु. मूळशब्दांचे रूपान्तर कसकसे होत गेलें आहे, हे निदान थोड्याबहुत तरी प्रमाणाने वाचकाच्या ध्यानांत येण्यासाठी, शब्दापभ्रंशाचे काही नियम केवळ संक्षिप्त रूपानेच येथे देतो. कारण, तद्विषयक साद्यन्त विवेचन करण्याचे हे स्थळ नसल्यामुळे, तसे करता येत नाही. | स्वरासंबंधी नियम. १ प्राकृतांत, ऋ, ऋ, लु, लु, ऐ, व औ, या स्वरांचा उपयोग करण्यांत येत नाही. २ ऋची रि होते. उ०. घृतं=वी. शृंगं= शिंग. परंतु त्याच्या मागें व्यंजन असल्यास त्याच्या ऐवजी अ, इ, किंवा उ, यांचा आदेश बहुतकरून होतो. उ० मृतं=मढे. कृपा=कीव. । ३ ऐची ए अथवा अई, किंवा क्वचित् इ अगर ई होते. उ० धैर्य=धीर. ४ औचा ओ किंवा अउ, आणि केव्हां केव्हां उ होतो. उ० गौर=गोरा. औषध=ओखद. सौराष्ट्र = सोरट. | ( देश ). सौन्दर्य=सुंदर. १ ए अगर ओ हे संयुक्तस्वर समजण्यांत येत नसून, ते व्हस्व किंवा दीर्घ होतात. ६ द्वित्त व्यंजनामागील स्वर दीर्घ असल्यास तो व्हस्व होते. ह्मणजे आ, ई, आणि ऊ, यांच्या ऐवजी अ, इ, व उ,