सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ५१ पुढे कालदेशवर्तमान पाहून इतुघरल नांवाच्या त्याच्या मुलाने आलादिनच्या हाताखाली नोकरी पतकरली. हा कोनी ( इकोनियम् ) चा सेलजुक घराण्यांतील सुलतान होता. त्यामुळे, त्याला बरेच पाठबळ मिळून, त्याने ग्रीक व मोगली लोकांवर स्वारी केली, आणि फ्रीजिया प्रांत आपलासा करून घेतला. पुढे, तेराव्या शतकाच्या शेवटी, कोनीचे सुलतान निर्बल झाले, व तुर्की लोक दिवसानुदिवस जोरावत चालले. तेव्हां, अर्थातच, उस्मानासारख्यास आपलें शौर्य प्रकट करण्यास योग्य सांघ सांपडून, तो रणभूमीवर आला, आणि बिथनियांत डॉगराळ वाटांनी शिरून, बायझानशियमच्या बादशाह सैन्याशी झुंजला, व त्यांचा अगदी भराभव केला. ह्याचा मुलगा औरखान हा देखील मोठा पराक्रमी होता, ह्याने इ० स० १३२७ व १३३० साली, निकोमीडिया आणि नीशिया, हे प्रान्त सर केले, व हेलेस्पांटवर आपला मोरचा फिरविला. तदनंतर, त्याने आपल्याला पादशहाचा किताब घेतला, आणि आपल्या राजसभेला “जंगी दरबार' असे नामधेय दिले. ह्याचाच मुलगा सुलेमान होय. ह्याने, इ० स० १३९७ साली, हेलेस्पांट वलांडून ग्यालिपोलि व सेस्टास काबीज केले, आणि त्यामुळे डार्डनेल्स देखील त्याच्या ताब्यात आले. पुढे, पहिल्या मुरादने इ० स० १३६२ साली आद्रियानोपलू घेतले, व तेच आपल्या राजधानीचे ठिकाण करून, मासिडोनिया सर केलें. इतकेच नव्हे तर, इ० स० १३८९ सालीं, त्याने बल्गेरिया, सहिया, आणि क्रोटिया, यांच्या संयुक्त Խր
पान:भाषाशास्त्र.djvu/62
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही