या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ ... भाषाशास्त्र. भाषाशास्त्र, ध्वनीमुळे शब्द उदयास आला; त्या शब्दाचे महत्व, त्याची खरी योग्यता, त्याचा अर्थ, आणि त्याचा उपयोग, यांविषय येथेच थोडीशी मीमांसा केली पाहिजे. शब्द व अर्थ यांचा इतका निकटसंबंध आहे की, एशब्दार्थाचे नित्य- कांतच दुस-याचा अंतर्भाव होतो; व त्व व त्याबद्दल, एकाचा उच्चार झाला, ह्मणजे दुसव्याची व्यंजकताही सहजच दिसन येते. किंबहुना, पट आणि तंतू, अथवा गूळ आणि गोडी, यांच्यांत जसे दुजेपण राहणे शक्य नाहीं; किंवा, । सुखदुःखाचा बांधा ॥ जैसा जोडफळाचा सांधा ॥ निमंत्रण दिलिया अंधा ॥ सवेची दोघे येती ॥ हे जसे शब्दशः खरे आहे, त्याचप्रमाणे शब्द व अर्थाचे असून, त्यांची ताडातोड केव्हाही करितां येत नाहीं; व ते एकमेकांपासून कधीं देखील वेगळे होतच नाहींत, । * ह्या शब्दार्थाचा कसा एकजीव आहे, आणि ते एकमे कवि आणि मी- कांत कसे अन्तर्धान पावले आहेत, हे मांसकारांचे मत. कालिदास कविकुलावतंसाने थोडक्यांत, परंतु अगदी स्पष्टपणे दाखविले आहे. वागविवसंपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये । जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥ १॥ ( रघुवंश. १ ला सर्ग.) आमच्या मीमांसकारांनी तर, ह्यासंबंधाने एका स्वतंत्र सूत्राचीच योजना करून, शब्दार्थाचा परस्पर संबंध केवळ नित्यच असल्याचे सिद्ध केले आहे.