भाषापपाते, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६५ औत्पत्तिकस्तु शब्दस्यार्थेन संबंधस्तस्यज्ञानमुपदशोऽव्यतिरेकश्चार्थेनुपलब्धेतत् प्रमाणंबादरायण स्यानपेक्षत्वात् ॥३॥ ( मीमांसादर्शन, अ० १. पा० १. सू० ९.) | ह्या महत्वाच्या सूत्राचा भावार्थ इतकाच की, शब्दाचा व अर्थाचा परस्पर संबंध नित्य आहे. ह्या नित्यसंबंधाचे जें ज्ञान तोच उपदेश असून, त्या उपदेशाला कधीच विपर्याय नाही. मात्र, अर्थाच्या अज्ञानानें विपर्यास होतो. यासाठी, बादरायणाच्या मताप्रमाणे उपदेश प्रमाण आहे. कारण, त्याला प्रत्ययान्तराची अथवा दुस-या ज्ञानाची अवश्यकताच नाहीं. ह्यावरून, शब्दोच्चार होतांच अर्थ उत्पन्न होतो, हे प्रतिपादन मीमांसकारांनी सिद्ध केले आहे. म्हणजे, शब्दोचाराला अर्थावांचून गतिच नाही, हे उघड होय. तात्पर्य, शब्दाचा अर्थ निय असल्याकारणाने, त्याचे शब्दाचे मूल्य, मूल्य, त्याचे महत्व, आणि त्याची उपयुक्तता, हीं निःसंशय अपूर्व आहेत; व यासाठींच, प्रभाकर भट्टादि मीमांसकांनी, मीमांसेंतील सहा प्रमाणांतच शब्दाची देखील गणना केली आहे. । १ ही सहा प्रमाणे खाली लिहिलेली होतः१ प्रत्यक्ष, २ अनुमान, ३ उपमान, १ शाब्द, ५ अर्थापत्ति, व ६ अभाव. माधवाचार्यांनी आपल्या जैमिनीय न्यायमालावस्तारांत असे प्रतिपादन केले आहे की, १ प्रत्यक्ष व २ अनुमान, ही धर्मविचारांत प्रमाणेच नाहींत.
पान:भाषाशास्त्र.djvu/76
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही