या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ भाषाशास्त्र, केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा नचन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः । वाण्येका समलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ॥ (भृर्तहरिकृत नीतिशतक.) | ह्या कविवराचा काल अद्यापि निश्चित झालेला नाहीं. तथापि, हा भर्तृहरि विक्रमादित्याचाच भाऊ असून, तो ३० स० पूर्वीच्या पहिल्या शतकांत उदयास आला होता, असे कित्येकांचे मत आहे. तेव्हां अर्थात्च, त्याला होऊन आज जवळ जवळ दोन हजार वर्षे झाली, हे उघड आहे. सबब, तितक्याही पुरातनकाळी, भाषेच्या संबंधाने आमचे किती उदात्त विचार असत, हे कोणाच्याही लक्षांत सहज येईल. | पण भाषेचे खरे स्वरूप, आणि वाचेचा नितान्त महिमा, यांचा पूर्ण संस्कार आमच्या पूर्वजांच्या तद्विषयक अथर्व- अथर्व- हृत्पटिकेवर, भर्तृहरीच्याही पूर्वी अ । । नेक शतके झाला होता, यांत लेशमात्र देखील शंका नाही. कारण, त्याचे प्रत्यक्ष प्रमाण, अथर्ववेदासारख्या पुराणतर ग्रंथांतच आपणांस उपलब्ध होते. अथर्ववेदांत भाषेला दैवतपदाप्रत चढविले असून, तिला वाग्देवी अशी संज्ञा दिली आहे; । | १ भर्तृहरीच्या कालाबद्ल कैलासवासी नामदार काशिनाथ व्यंबक तेलंग यांनी पुष्कळ ऊहापोह केला आहे. ( ह्यांनी संशोधन केलेले शतक पहा.) Vide also Max Muller's “ What can India Teach us ? First Edition. P. P. 310-338 @ 450. टांनी वान