या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रियतम ऐकण्यांत किंवा पहाण्यांत नाहीं, येवढे मजला कबूलच केले पाहिजे. सबव, ह्या संबंधानें आपल्या आर्यभूमीची सेवा कशी बशी तरी आपल्या हातून घडावी, इतकाच हेतु वरून, हा मनोभावाने केलेला अत्यल्प प्रयत्न मी आपल्या नितान्तप्रिय मातृसंवेशी केवळ भीतभीतच सादर करीत आहे. भीतभीत हाणण्याचे कारण इतकेच कों, आर्यमा- तेच्या योग्यतेप्रमाणे आणि ऐश्वर्यानुरूप ही सेवा झालेलो नसून, ती गोष्ट हा सेवक पूर्णपणे जाणून आहे. परंतु, शक्तीशिवाय भक्ति नाही; माळावांचून कड नाहीं; व माये- वांचून रडे नाहीं. सबच, यथामति जे काही झाले तेच, भी आपली इतिकर्तव्यता समजून, मातृचरणी अर्पण करीत आहे. ही अत्यल्प सेवा बजावितांना, मनला अनेक ग्रंथांचें साहाय्य झाले आहे. सबब, त्याबद्दल केवळ आनंदानें व कृतज्ञतापूर्वक, मी त्या त्या ग्रंथकारांचे आभार मानितों. हा भाषाशास्त्रविषयक प्रयत्न पहिलाच असल्यामुळे, त्यांत अनेक चुका होण्याचा संभव आहे. आणि माझ्या- सारख्या अल्पधीच्या हातून तर त्या केवळ संख्यातीतच होतील; व मतभेदही ठिकठिकाणी होईल, यांत कांहींच संशय नाहीं. तथापि, तत्संबंधाने वाचकांनी मजवर अनुग्रहच केला पाहिजे, अशी माझी त्यास विज्ञप्ति आहे. नारायण भवानराव पावगी. मुकाम पुर्णे, मंगळवार, मार्गशीर्ष शुद्ध १३ शके १८२२ शायरीनामसंवत्सरें.