या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषाशास्त्र.

 शिवाय, भाषा म्हणजे काय; ती कशी उत्पन्न झाली; तिच्यांतील मूळशब्द कोणते; ते कसे त्याची व्याप्ति. प्रचारांत आले; त्यांचें ऐतिहासिक बीज केव्हां दृग्गोचर होऊं लागले; आपापले विचार प्रद शित करण्यासाठी, मनुष्यमात्राला शब्दांची आवश्यकता केव्हां व कशी भासमान झाली; ही उत्पन्न झालेली अड- चण दूर होण्यास्तव त्याने कोणते उपाय योजिले; कशा प्रकारची सांकेतिक चिन्हें त्यानें अमलांत आणिलीं; कोण- कोणत्या वाकसंज्ञांचा त्यानें उपयोग केला; लिपिज्ञानांत, किंवा लेखनकलेत, त्यांचा कशा प्रकारें उपयोग झाला; ह्या संबंधाने आमच्या आर्य पूर्वजांनी कोणत्या दिशेनें कसे प्रयत्न केले; इतर पौरस्य राष्ट्रांनी तद्विषयक कोणते यत्न चालविले इत्यादि सर्व बाबतींचा समावेश भाषाशा- स्त्रांतच होणें विशेष अगलाचें आहे.
 त्याचप्रमाणे, भाषा ही अमानुषी व देवी आहे, किंवा ती कृतक आणि समाजघटित समजण्याची; ती मानवी कुटुंबाची द्योतक आहे कीं नाहीं; म्हणजे, भाषाभिन्नत्वाने कुटुंबभिन्न अथवा वर्णविभेद समजण्याचा कीं कसे; भाषेचा उद्गम प्रथमतः कोटें झाला; तिचा ओव कोणी- कडून कोठें चालला; तिचा प्रसार कोणीकडे कसकसा होत गेला; त्या कारणानें, तिच्यांत कोणत्या प्रकारचें स्थित्यन्तर होत चाललें; याचा काय परिणाम घडून आला; भाषेच्या जन्मभूमीवरून, राष्ट्राचें आदिनिवासस्था काढतां येणें शक्य आहे की नाहीं; वगैरे गोष्टींचा अन्त- वही भाषाशास्त्रांतच झाला पाहिजे.