या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

30 इतिकर्तव्यतेची प्रेरणा. भाषाशास्त्र. हीं मनांत येऊन, व माझ्या इति- कर्तव्यतेला जागरुक होऊन, अशा प्रकारचें साहस करण्यास मी केवळ भीतभीतच प्रवृत्त झाला आहे. शिवाय, माझ्या अल्पप्रयत्नांत असंख्य दोष व अक्षम्य विसंगता ठिकठिकाण असणारच. रा कार्यभाग व त्यापासून होणा- तेव्हां, निदान ती काढण्याच्या हेतुनें तरी, एकाद्या विद्वानास स्फूर्ती होऊन, अथवा अकस्मात् उत्तेजन मिळून, त्याने ह्या प्रिय महाराष्ट्र भाषेची सेवा केल्यास, मजला मातृ व पितृ सुखाच्या लाभासारखाच अत्यानंद होऊन, माझ्या श्रमाचें चीज होईल; आणि माझे सर्व इष्टहेतु सिद्धीस गेल्याप्रमाणेच मी खचित समजेन. , असो. हें भाषाशास्त्र इतक्या योग्यतेचें आहे तरी, त्याचे बीजांकूर भगदीच क्षुद्रसे भास- तात; व त्या योगार्ने, निदान' प्रथमतः तरी, त्याचें यत्किंचित् देखील महत्व आपणांस वाटत नाही. किंबहुना, ह्या जगांतील बहुतेक महत्वाच्या गोष्टींचें मूळ पाहू गेले असतां तें अगर्दी अल्पसेच असते; आणि त्यामुळे, त्याचा खरा प्रभाव निदान प्रथम दर्शनी तरी आपल्या लक्षांत बिलकूल येत नाहीं. अल्पकारण व मह- त्कार्य. उदाहरणार्थ, वैदिक कालांतील आमचे यज्ञच घ्या. हे बाह्यदृष्टया जरी आपणांस सामान्यसे वाटतात, तरी ज्योतिःशास्त्र प्रगहमतेस येण्याला तेच कारणीभूत झाले आहेत. एवढेच नव्हे तर, ज्योतिःशास्त्राचें ते एक मूळ बीजच