या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्य विवेचन व दिग्दर्शन. - येतात; किंवा उद्भिविद्येत ज्याप्रमाणे वनस्पतींच्या गुण- धर्माचही हुबेहूब वर्णन होते; त्याचप्रमाणे भाषाशास्त्राचें असून, ह्याचे नियम देखील पुष्कळ बाबतींत अगदी ठरीव व अबाधित आहेत. मात्र, इतकेंच कीं, इतर शास्त्रे जशी पूर्णतेप्रत पोहोचली आहेत, अथवा पोहोचण्याच्या रंगांत आहेत, त्याप्रमाणे ह्या शास्त्राचे नसून, ते नुकतेंच वाढीस ते लागले आहे. किंबहुना, ते अजून बाल्यावस्थेतच आहे, असेही म्हटलें असतां चालेल, , तथापि, अशा प्रकारच्या प्रथमावस्थेत सुद्धां, शोधक मनुष्याला हे भाषाशास्त्र पूर्णतेस आणण्याला कोणत्याही साधनाची बिलकूल वाण नाही. कारण, ह्या भाषामहोदधत, शब्दमौक्तिकांच्या असंख्य शुक्तिका, इत- स्ततः, आणि द्वीपसमुदायांत, व खंडान्तरी, एकसारख्या पस- रलेल्या असून, या गोळा करण्यासाठी, ज्यानें म्हणून आपली कास धैर्याने व एकनिष्ठेनें बांधली आहे, त्यास त्या प्राप्त झाल्यावांचून खचितच राहणार नाहीत. फार तर काय सांगावें, पण त्या शुक्तिकांतील अपूर्व आणि उज्ज्वल दीप्ति त्यास लागलींच भासमान होऊन, त्यांतील प्रत्येक शब्दमौक्तिकांचा साद्यन्त इतिहास त्याच्या डोळ्यांपुढे केवळ मूर्तिमंतज्ञ उभा राहील. भाषाशास्त्र विषयक साधनांची परिपूर्णता. स्थळे, मासल्याकरितां, आपण आपले भरतखंड अथवा आर्या- भाषा सामग्रीची वर्तच जरी घेतले, तरी त्यांत देखील, अतीव अमूल्य रत्नांची एक वि येथून, असंख्य शब्दांनी कोट- शाळ खाणच सांपडेल.