या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. t , कोठे प्रवास केला; अनेक शब्दांचे कसकले स्थलान्तर झाले; नानाविध भाषाप्रचारांत कोणत्या तऱ्हेनें फेरबदल होत गेले; इराण, आमनिया, इजिप्त, ग्रीस, रोम, जर्मनी, नॉर्वे, इंग्लंड, इत्यादि देशांत संस्कृत शब्दांचे कशा प्रकारें रूपान्तर बनले; पातालांत, अगर अपर गोला- र्धावर ज्या भाषा बोलतात, त्या भाषांतील शब्दांत, संस्कृत शब्दांचें, म्हणजे अर्थात् आर्यहिंदूंच्या कुटुंबांतील शब्दांचें, कांहीं साम्य आहे, किंवा त्यांच्यातील शब्दकोश त्याहून अगर्दी भिन्न आहे; ह्याच गोलार्धाच्या तोयराशीत जी अगणित लहान मोठीं बेटे आहेत, त्यांतील क्रूर लोक कोणती भाषा बोळतात; तसेच, ह्या रानटी लोकांच्या भाषापद्धतीत, व आफ्रिका खंडातील सिध्धी, इचशी, आणि कृष्णदेही वनचरांच्या शब्दरचनेंत, किती व कशा प्रका. रची भिन्नता आहे; इत्यादि संबंधों शोध फारच मोहक, विशेष चित्ताकर्षक, आणि निःसंशय फलप्रद आहेत. 0 आतां, भाषाशास्त्राचे विवेचन करण्यापूर्वी, भाषा म्ह णजे काय हे सांगून, तिची प्रथमतः व्याख्या देतो. आपले मनोगत व्यक्त . भाषेची व्याख्या. व्हावे यासाठी किंवा आपल्या मनांतील कल्पना बाहेर पडून त्यांचें स्पष्टीकरण व्हावें एतदर्थ, अथवा आपले विचार एकमेकांस प्रदर्शित करता यावेत म्हणून, जीं सांकेतिक चिन्हें ठरविण्यांत आली, अगर जी वाक्संज्ञा अमलात आणिली, तिळाच भाषा हे नामधेय प्राप्त झाले. तथापि, श्लेचर प्रमृतीचें याहून अगदर्दी भिन्न मत आहे. १ Collection Philologique, Bikkers. 1869.