या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. नत्व असते, व तें स्वरानुपूर्व्याने व्यक्त केलेले दृष्टीस पडतें. किंबहुना, भाषा म्हणजे समाजानें निर्माण केलेली कृति, असें देखील म्हणण्यास हरकत नाहीं.. ह्यावरून, भाषा ही कृतक किंवा समाजघटित आहे, असे वाटते. आणि म्हणूनच, तिची उत्पत्ति व उत्क्रान्ति केवळ मनु- प्याच्या प्रयत्नानेंच झाली असल्याचें दिसते. अर्थात्, ती अमानुषी किंवा दैवी असावी, अशी कल्पना करण्यास बाध येतो, कारण, आपण हल्लीं जी भाषा बोलतों, ती प्रस्तुतच्या स्थितीतच आपणाला ईश्वरा कडून मिळाली नसून, तिच्यांत आजपर्यंत अनेक सुधारणा, असंख्य फेरफार, आणि अकल्पित रूपान्तरें देखील झालेली आहेत. इतकेच नव्हे तर, कित्येक प्रसंगी तीत समाजाच्या इच्छेनुरूपच फेरबदल होतात, हे अगदी सप्रमाण दाख विता येईल. भाषाहीन- मून, नी मानुषी आहे. ह्या संबंधानें लॉर्ड माँनबोडोसारख्या बहुश्रुत गृहस्थाचा अभिप्राय फारच चमत्कारिक असल्याचे दिसते. कारण, त्याने एके ठिकाणी असे प्रतिपादन केले आहे की, ईश्वरी साहाय्य व दैविक मध्यस्तीशिवाय, भाषेचा उद्गम होण्याला मार्गच नमन, ही मुळभाषा मिलर देशांतील असुरी 9 Language is the ercation of Society." ( Sayce's Introduction to the Science of Ianguage. P. 75). 2 Ancient Metaphysics. (vol. IV. P.357.)