या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. कारणीभूत झाला आहे याचा विचार केला, म्हणजे भाषा ही दैवी नसून, ती समाजवटितच आहे, असे म्हणणे प्राप्त येतें. मानण्यास कारण. कारण, आपले विचार एकमेकांस सुलभ रोहीने प्रद- शित करता यावेत एतदर्थ, जो सां- केतिक चिन्हें मनुष्याने ठरविलीं, अथवा परस्परांचे विचार आपापसांत कळण्यास ज्या बाकूसंज्ञा त्याने अमलांत आणिल्या, त्यां सच भाषा अशी संज्ञा असल्यामुळे, ती कृतक आहे, आणि जमानुषी नाही, हे उघडच सिद्ध होतें. शिवाय, भाषाशास्त्र म्हणजे ह्या भूतलावर हल्लों व्यवहारांत असलेल्या किंवा पूर्वी प्रचलित होत्या अशा- एकंदर भाषांचा इतिहासच मानावयाचा. अथवा, आ- शिया, यूरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आणि अमेरिका, या विशाल रंगभूमीवर जे भाषांचे एकावर एक असे अनेक पडदे पडत गेले, त्यांचे अवलोकनच समजावयाचें, अगर, उत्तर टोकाकडील उत्तरकुरु, व दक्षिणेकडील सिंधी, आणि त्यांच्या दरम्यान राहणारे लोक, यांच्या भाषा- { , १ ह्या उत्तरकुरूंस ग्रीस देशांतले लोक हायपरचोरियन्स म्हण ह्या ( Hyperboroans ) शब्दाचा अर्थ पर्वतापलीकडील ' असा होतो. ह्यांतील उत्तरार्ध ( Boros) बोगस असून, तो ओराँस ( oros ) पर्वत, या शब्दापासून झाला आहे; व हा शब्दही संस्कृत

  • गिरि

शब्दापासूनच बनला असल्याचे दिसतें. प्राचीन स्लॉव्हाँनिक भाषेत ह्या शब्दाचे रूप 'गोरा' अर्से झाले आहे. 4 २. हा शब्द संस्कृत ( इन्धू = पेटविणे, या ) शब्दापासून झाला असावा, असे वाटतें एथियोपियन् ( Ethiopean ) शब्दाचा ( पुढे चालू)