या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. तील शब्दसनांचें इतिहासदृष्टया परीक्षणच होय, असेंही म्हटलें असतां बाघ नाहीं. न अशा प्रकारची वस्तुस्थिति असल्यानें, भाषाशास्त्राची गणना पदार्थविज्ञानशास्त्रांत करतां, ती ऐतीय किंवा इतिहास शास्त्रांतच करणे विशेष पद्धतशीर होईल, अशी माझी अल्प समजूत आहे. तथापि, प्रोफेसर भॉक्समुलर प्रभृति, या मताविरुद्ध आहेत. आणि डाक्तर व्हेवेल वगैरे जरी त्यांच्या अभि- प्रायास अनुकूल नाहीत, तरी मॉक्समुलर हे असे प्रति- पादन करतात की, भाषाशास्त्राचा समावेश पदार्थावज्ञान शास्त्रांतच झाला पाहिजे. भाषाशास्त्राची इति- हासंशाखांत गणना. असो. ह्या भाषाशास्त्राचे सविस्तर निरूपण करावयास लागलें, म्हणजे ह्या भूतलावर एकंदर भाषा किती आहेत, व त्यांतही प्रमुखत्वानें कोणाची गणना होते, त्यांचें वर्गी- करण कसें करण्यांत येतें, इत्यादि संबंधाचे महत्वाचे प्रश्न एकामागून एक असे, सहजच उत्पन्न होतात. सबब, त्या बाबतीत अवश्य ती तपशीलवार हकीकत आरंभीच देणे इष्ट वाटल्यावरून प्रथमतः तिकडेच वळतों. (मागील पृष्टावरून पुढे चालू ) उद्गम देखील ह्याच शब्दापासून आहे, एथिओपियन शब्दाचा वात्वर्थ ( एथिऑप्स, ऐथॉप्स, म्हणजे उग्राकृति होय; व तो शब्द 'ऐथीन् ' aithein शब्दापासून झाला असून, त्याचा अर्थ ) पेटविणे, जाळर्णे, असा होतो. (कर्शियस पहा.) ₹ Lectures on the science of Language, Vol I P. P. 30-31. Lecture 2nd.