या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशाल. इ० स० १७८७ साली, रूस देशांतील कॉथराईन् नांवाच्या महाराणीने स्वतः परिश्रम दूर भाषा. इतकेंच पृथिवीवरील एक घेऊन, आणि आपल्या विस्तीर्ण रा- ज्यांतील सुभेदारांकडून, न ठिकठि- काणच्या राजकीय वकीलांस पत्र लिहून, ह्या भूतलावरीलं एकंदर भाषांसंबंधों पुष्कळ माहिती मिळविली. नव्हे तर, ह्या उपलब्ध झालेल्या माहितीवरून, तिनें एक कोशही तयार करविला. पुढें, इ० स० १७९०-९१ साली, विल्हेवारीप्रमाणे त्यांतील शब्द लावून, त्याचे एकंदर चार भाग केले, आणि सदरहू कोशाची दुसरी आवृत्ति छापिली. त्यावरून असे कळून येतें कीं, चाही खंडां- मिळून, ह्या पृथिवीवर एकंदर (२८०) दोनशे ऐंशी भाषा आहेत. ह्यापैकों, १८५ आशिया खंडातील असून, १२ युरोपखंडांतल्या, २८ आफ्रिकेतल्या व १५ अमेरिका- . खंडांतील होते. तथापि, ह्या गोष्टीला आज सुमारे शंभर वर्षीवर होऊन गेली असल्यामुळे ह्या मुदतीत कांहीं अन्य भाषांचा शोध लागला जाऊन, कित्येक नूतन भाषांचीही त्यांत मरे पडली असावी, असे वाटतें; आणि तसे होणें देखील अगदर्दी साहजीक आहे. , , आतां, हा कोश जरी पुष्कळ उपयुक्त व बऱ्याच अंशाने महत्वाचा आहे, तथापि, त्यांत एकंदर भाषांची वर्गवारी पद्धतशीर रीतीनें, किंवा शास्त्रीय दृष्ट्या, फेलेली १ बादशाही कोश. Glossarium Comparativum Lin- guamum totius Orbis, Petersburg, 1787, पहा. ८. हरवॉमच्या भाषासंग्रहावरून, एकंदर तिनश्यांवर ह्या भूतला वरील भाषा असल्याचें होतें. (१-६३).