या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन दिग्दर्शन. असल्याचे दिसत नाहीं. इसकेंन्द्र नन्हें तर, उपलब्ध झालेल्या भाषांचे विवेचन सशास्त्र व्हावें, एतदर्थ प्रयत्न केल्याचें सुद्धां भासत नाही. कारण, त्यांत भाषांची वर्ग. वारी भूविषयक केली असून, त्या आशियांतील, यूरोपां. तल आफ्रिकेतील, अमेरिकेतील, आणि सामुद्रिक किंवा द्वीपसमुहांतील, अशा योजिलेल्या आहेत. त्यामुळे, त्याचा व्हावा तितका उपयोग होत नाही. परंतु, अर्से आहे तरी, कोणकोणत्या भाषांत कशा प्रकारचें साम्य आहे, हे कळ- ण्यास त्याची प्रथमारंभी विशेष मदत झाली, हे कोणालाही कबूल केले पाहिजे. त्यांचे वर्गीकरण. असो. ह्या सर्व भाषांचें सूक्ष्म अवलोकन केल्यानें, असे दिसून येते की, ह्यांपैकी कित्ये- कांतील शब्दांत, किंवा विभक्तींच्या प्रत्ययांत, अथवा क्रियापदांच्या रूपांत, फारच निकट साम्य आहे. कित्ये. कांत हैं सादृश्य म्हणण्यासारखे नसून, कचित् तें बिलकुल दृग्गोचरही होत नाहीं. आणि कांहींची रचना खरोखर अगौंच भिन्न आहे. तेव्हां, ह्या सर्व गोष्टी मनांत आणून, आपण ह्या अगांध भाषारत्नाकरांत बुडी मारिली, अगर ह्या विचित्र वागुदर्घाचे शास्त्रोक्त पद्धतीने यथान्याय मंथन केलें, तर आपणांस असें निःसंशय कळून येईल कीं, कांहों भाषांचे संस्कृतार्थी असन्त साम्य आहे. सबब, त्यांचा समा वेश आर्य कुटुंबांतच झाला पाहिजे; कारण, सं स्कृत ही आर्य कुटुंबांतील सर्व शाखांची आदिजनेनी होय. • संस्कृतभाषेकडे मातृपदाचा बहुमान कोणत्या कारणांनी येतो, 'याबद्दलचा सायन्त ऊहापोह आणि सपशिलवार हकीगत, आम्ही ( पुढे चालू) 1