या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ६ स्ल्या व्हॉनिक् अथवा विंडिक आणि ७ सेल्टिक्. आतां, संस्कृत मायभाषेच्या ज्या मुख्य शाखा सदरी नमुद केल्या, त्यांचेही अनेक पोटभेद असून, ते फार महत्वाचे आहेत. सचव, विषयविवेचनाच्या सोईसाठीं, व वाचकास इतल्ला पाहण्यास स्वल्प पडावें म्हणून त्यांचीच अवश्य तो हकीकत प्रथमतः देतो. दी शाखेचे फोटभेद. १ भारतीय किंवा हिन्दी शाखेचे १ पाली आणि २ प्राकृत असे दोन पोटभेद आहेत. भारतीय किंवा हि ह्यापैक, पाली हल्ली प्रचारांत नसून ती मृत भाषा झाली आहे. प्राकृताचे मात्र १ शौरसेनी, २ गौडी, ३ लाटी, ४ पैशाची, 4 आवन्ती, ६ मागधी, ७ अर्ध मागधी, ८ प्राची, ९ महाराष्ट्री, १० द्राविडी, व ११ बाल्हीकी, असे मुख्य अकरा प्रकार असून, ह्याशिवाय आणखीही प्रांतिक मेद पुष्कळच आहेत. ह्यापैकी, महाराष्ट्री आणि द्राविडी खेरीज करून, बाकीच्या बहुतेक मृत भाषा होऊन, • त्यांच्या ऐवजी हिन्दुस्थानी, बंगाली, पंजाबी, गुजराथी, ऊरीय, ऊर्दू, सिन्धी, पहाडी, आसामी, मारवाडी, कच्छी, हळवी, काश्मीरी, गोवाणी, इत्यादि अनेक भाषा उद्भवस्था आहेत. आतां, सर्व आर्य भाषांचें मूळ संस्कृतच असल्या १ द्राविडी भाषेचा समावेश कित्येक पाश्चात्यांनी तुराणो वत केला आहे. ( भारतीय साम्राज्य उत्तरार्ध पु० ९वें. भाग ५५-५६. पान १५१-१५२ व २१५ ते २२५ पहा ) .