या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बल्गुक शब्दाचा ही त्र्यंत आलगम (Algum ), व जुन्या करारांत एके ठिकाणी आलमग ( Almug ), असा अपभ्रंश झाल्याचे आढळते. ह्या वल्गुक शब्दाचा अर्थ पूर्वी सांगितल्याप्रमाणे चन्दन होय. संस्कृतांता कपि शब्द वानरवाचक असून, याचेंच ही कॉफ (Koph) अर्से रूपान्तर झाले आहे. हा शब्द हीब्यूंत नाहीं, व त्यामुळे ह्या भाषेत त्याची शब्दव्युत्पत्ति होणे अर्थात, देखील बिलकुल शक्य नाहीं. शिखिन् अथवा शिखी हा त्याचाच हीब्यंत तुखि इम आढळून येते. ह्याचप्रमाणें, संस्कृतांत मोर शब्दाचाच पर्याय शब्द होय, आणि असा अपभ्रंश झाल्याचें हस्तिदन्ताचे देखील झालें आहे. हस्तिदन्त म्हणजे हत्तीचा प्रत्यक्ष दांतच होय. आतां, दांताला ही त्र्यंत शेन ( Shen) म्हणतात, व हत्तील संस्कृतांत इभ हा पर्याय शब्द आहे. तेव्हां, उघडच, ह्या उत्तरार्धाचेंच हीव्यू भाषेत हविम अर्से रूपान्तर होऊन, शेन = हबिग असा हस्तिदन्त वाचक शब्द बनला. अशाच मासल्याचे दुसरेही कित्येक शब्द आहेत, व व्यावरून, शमी भाषांत फार पुरातन म्हणून मानलेली जी हीव्यू भाषा, ती सुद्धा संस्कृतची पूर्णपणे ऋणी असल्याचें वाचकांच्या ध्यानांत येईल. ह्यासंबंधानें, मॉक्समुलरनें एके ठिकाणी फारच जोर- दार लेख लिहिलेला असून, तो निःसंशय वाचण्यासारखा आहे. सबब, त्यांतील अवश्य तें अवतरण वाचकांच्या सोईसाठी येथे देतों. तो म्हणतो,