या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० भाषाशास्त्र. अर्थात्, ती ब्राह्मणांची कूटरचना नव्हे; अथवा, त्यांनी हिन्यांत कोणतेही बनावट लेख, केव्हां देखील लिहिलेले नाहीत; अशी आतां तरी पाश्चात्यांची खात्री होईल, एवढी आम्ही आशा करितों. 3 इराणीचे पोटभेद. २. इराणीत, झन्द व पल्लवी यांचा समावेश होत असून, ह्या दोन्ही भाषा हल्ली प्रचा- रांत नाहीत. तथापि, ह्यांच्या ऐवज, फारशी, अफगाणी, बलुची, पखतु अथवा पुष्ढे, काँके- ससमधली ऑसेशियर, कुरदिस्थानी, आणि आमनियन् भाषा व त्यांचे पोटभेद, इत्यादि व्यवहारांत आहेत, व ते इर्रोण, अफगाणिस्थान, बलुचिस्थान, आर्मीनियाँ, इत्यादि देशांतले लोक बोलतात. पल्लवी भाषा. झन्द शब्द हा संस्कृत छन्दस् शब्दाचा अपभ्रंश असल्याविषयी आम्ही पूर्वीच सांगित- ले असून, झन्द भाषेच्या संबंधानें देखील आम्ही अवश्य तें दिगदर्शन केले आहे. सचव, आतां पलवी भाषेकडे आपण क्षणभर वळं, आणि तिच्या- बद्दलची अवश्य ती हकीकत येथें देऊं. ह्या भाषेच्यासंबंधाने अनेक विद्वानांचे नाना तव्हेचे $ १ पुष्टु व भरतखंडांतील भाषा, यांच्यांत विशेष साम्य असल्यावि- पयीं ट्रम्पनें सप्रमाण दाखविले आहे. ( Journal German Oriental Society. vols. XXI. XXII Trumpp's Grammar of Pashtn. 1873 ) २ बोरवारी भाषा इराणीचा पोटभेदच असल्याविषयी मॉक्स- मुलरचें मत आहे.